विरार मठाची माहिती
अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ
कुलस्वामिनी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट
अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, विरार मठ रजि :एफ / २९३०९ / ठाणे स्थापना ८, मार्च २०१२ मा. संस्थापकांनी भक्तगण वाढवल्यानंतर एक विश्वस्त मंडळ स्थापन करून जास्तीत जास्त लोकांना पर्यंत भक्ती पोहोचावी त्याचा प्रसार व्हावा. या उदेशाने विश्वस्त मंडळ स्थापना करून हि जबाबदारी विश्वस्त मंडळाकडे सोपवली.
विरार मठाची स्थापना 2016 साली झाली आणि 8 मार्च 2017 रोजी श्री स्वामी समर्थ मठात विराजमान झाले.
स्वामींची मूर्ती एक टन वजनाची आहे,तरी त्यांच्या एका बाजूला आई जीवदानी देवी तर दुसऱ्या बाजूला आई तुळजाभवानी (कात्राई देवी) बसवण्यात आली आहे
स्वामींच्या समोर शिवलिंग बसवण्यात आलेले आहे.
तसेच मठामध्ये दत्त महाराज आणि महाकाली देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे. तसेच हनुमानाची मूर्ती, गणेश मूर्ती, कुबेर मूर्ती,महालक्ष्मी मूर्ती,कालभैरव मूर्ती व मूळ पूर्वज यांच्याही मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत
तरीही अजून काही मूर्ती स्थापन करायचे काम चालू आहे