संस्थेचे ध्येय व उदिष्टे
अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ
परिसरातील प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौधीद्कदृष्टी विकास करणे.
शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा या करिता निरनिराळे शैक्षणिक उपक्रम राबविणे उदा. बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय, इंग्रजी, मराठी, हिंदी माध्यम शाळा, डी.एड, बी.एड, मार्गदर्शन केंद्र, तांत्रिक विद्यालय, कलाकेंद्र, संघनक प्रशिक्षण केंद्र, औधागिक, प्रशिक्षण केंद्र तंत्र निकेतन, वैधकीय, शेतीकी महाविद्यालय स्थापन करणे व चालविणे
विविध सन साजरे करणे, उद. महाशिवरात्र, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, बुद्धपौर्णिमा, सामाजिक हळदीकुंकू समारंभ तसेच २६ जानेवारी, १५ ऑगस्ट ई. राष्ट्रीय सन साजरा करणे सर्व आदरणीय राष्ट्रपुरुष यांची जयंती तसेच स्मरणार्थ स्मृतिदिन साजरा करणे व त्यांच्या विचारांचा प्रचार करणे संगिक उपासना व बालउपासना केंद्र सुरु करणे.
मुलांच्या निरनिराळ्या खेळांची प्रशिक्षण केंद्र तज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करणे. उदा. कब्बडी, खो-खो, कराटे, क्रिकेट.
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे गायन, नृत्यकला, इ. कलागुणांची जोपासणा करणे.
परिसरातील गरीब मुलांना व गरजू विद्यार्थांना मोफत वह्या, पुस्तक, गणवेश यांचे वाटप करणे, हुशार विध्यार्थाचा सत्कार करणे, मुलांमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे, त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव देणे.
शैक्षणिक योजनांचा लाभ घेणे, परिसरात वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका स्थापन करणे.
परिसरातील मुलांसाठी व्यायाम शाळा क्रीडांगण याची सोय करणे. तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी देशी विदेशी खेळांची शिबीरे आयोजित करणे. विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व त्यामध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा याथोचीत्ता गौरव करणे. व त्यांना प्रोत्साहन देणे. तसेच सभासदांना खेळाचे प्रशिक्षण द्यावे सपर्धा उदा. खो-खो, कब्बडी, टेनिस, धावण्याच्या शर्यती, बुध्दीबळ, कॅराम वगेरे.
समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे.
शासनाच्या योजनांची माहिती देणे.
महिलांच्या विकासाच्या दृष्टीने शासनप्रणीत योजनांचे मार्गदर्शन करणे, निरनिराळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
परिसरातील लोकांकरिता वैधकिय सुविधा, उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करणे
वृध्दाश्रम, अनाथाश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा, बाल संगोपन केंद्र, मुख बधीर, अपंग शाळा, सैनिक शाळा ई. चालविणे
पूरग्रस्त, दंगलग्रस्त, आपग्रस्त, नागरिकांना जिवनावश्क वस्तूंचा पुरवठा करणे. व नैसर्गिक आपत्त्तीत सापडलेल्यांना मदत करणे.
समाजातील अंधश्रदा रूढी नष्ट करण्यासाठी परिसंवाद, परिचर्चा घडवून आणणे, त्यातूनच समाज प्रबोधन व परिवर्तन करणे. व्यसनमुक्तीसाठी शिबीर आयोजित करणे.
एकाकी जेष्ठ नागरीकांना मासिक अर्थसहाय्य.
जेष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करणे.
विधवा / निराधार / घट्स्पोटीत महिल्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करणे.
कायमचे अपंगत्व असणाऱ्या
महिलांसाठी मासिक अनुदान लागु करणे.
महिलांसाठी रोजगार (उदयोग) उपलब्ध करुन देणे.
महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजन करणे.
महिलांसाठी कला महोत्सव साजरे करणे.
महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे.
महिला बचत गट स्थापन करणे.
पतपेढी उभारणे.
निराधार विद्यार्थाना शाळा शिकण्यासाठी अनुदान किंवा शैक्षणिक अर्थसहाय्य पुरविणे.
अनाथ / निराश्रित बालकांना अर्थसहाय्य पुरविणे.
जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करणे.
बाल कला महोत्स्व व् विविध स्पर्धा आयोजित करणे.
बाल मेळावे आयोजित करुनं मार्गदर्शन करणे.
विविध शिबिर आयोजित करणे.
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
व्यसनमुक्ति चळवळ राबविणे.
गोरगरीबांना महिना अत्यावश्यक वस्तुचे धान्य वाटप करणे.
निराधार लोकांसाठी मोफत देवदर्शन अयोजीत करणे.
गोरगरीबांना नवीन कपडे वाटप करणे.