कार्यकर्ता कसा असावा
अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ
निस्वार्थीपणाने सेवा करणारा.
स्वामी भक्तीची ओढ दिखावू पणा नसणारा.
आपल्या दु:खांपेक्षा दुसऱ्याच्या दु:खाचा विचार करणारा.
सद्गुरूंचा आदर ठेवणारा त्यांनी सांगीतलेले कार्य मना पासुन करणारा, त्यांना उलट उत्तर न देणारा, त्यांच्या आदेशाचे पालन करणारा कार्यकर्ता असावा .
आपल्या सहकाऱ्यांशी आदराने वागणारा , मी पणा नसणारा ,गर्व नसणारा असा असावा .
भक्तगणांशी आदराने वागणारा असावा.
स्त्रीयांन भगिनी व वरीष्ठ स्त्रीयांना माता मानणारा असावा.
कोणाची निंदा व हेवे दावे न करणारा असावा .
सदा नेहमी उत्साहित असणारा.
दु:खात ही उत्साहीत असणारा असावा .
मध्य पाशन न करणारा असावा.
आपल्या गुरुनी सांगितलेले वचन पाळणारा असावा .
गुरु निंदा करणारा नसावा.
आपल्या कार्याचा गाडा पुढे घेऊन जाणारा असावा .
स्वामी कार्या मध्ये बाधा न आणणारा असावा .
स्वामी कार्या मध्ये सहभाग असणारा ८ मार्च स्वामी प्रकट दिन , दत्तजयंती ,स्वामी पुण्यतिथी, महाशिवरात्री स्वत: हजर राहून दुसऱ्यांना त्यात सामावून घेणारा असावा.
गोरगरीबांची सेवा करणारा असावा .
आपल्याकडे माया असेल तर खुश राहणे व आपल्याकडे माया नसेल तर जळत राहणे असा नसावा .
स्वामी परिक्षेची जाणी व ठेवणारा असावा .
आपली चूक तात्काळ मान्य करणारा असावा .
सदा नेहमी गुरूच्या व संस्थेच्या भल्याचा विचार करणारा असावा .
स्वामी उपासनेने चांगले वागणे दाखवणे व बाहेर शिव्यागाळी करणे दुपटीपणा नसणारा कार्यकर्ता असावा .
संकटांना तोंड देणारा कार्यकर्ता असावा .
दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा नसावा .
सर्वांचा लाडका बनून दाखवणारा असावा .
रागाने पळून जाणे, रुसून बसणे, रागारागाने बोलणे, दुसऱ्याचा दोष दाखवणे, स्वतःचा दोष लपवणे, दुसऱ्यावर खापर फोडणे असा नसावा .
गुरुसेवा, गरीबांची सेवा, आजारी माणसाची सेवा करणारा असावा.
दुसऱ्याचे पायन खेचणारा दुसऱ्याला बरोबर घेवून जाणारा आपल्या सुखा पेक्षा दुसऱ्याच्या सुखा मध्ये समाधानी असणारा कार्यकर्ता असावा.
उपासने मध्ये नित्य उपासना घेणारा असावा .
खोटया अफवा न पसरविणारा व खोट्याला न बळी पडणारा कार्यकर्ता असावा .
आदेशाचे पालन करणारा कार्यकर्ता असावा .
|| श्री स्वामी समर्थ ||