आजीवन अन्नदान योजना
या योजनेत ठराविक रक्कम फक्त एकदाच भरुन भाविक आजीवन ( मठ / संस्था असे पर्यंत) योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजने द्वारा भाविकांनी दिलेल्या व्यक्तिच्या नावे किंवा ( स्मरणार्थ, पुण्यतिथि, वाढदिवसानिमित्त ) मठात अन्नदान वर्षातून एकदा दिलेल्या तारखे प्रमाणे केले जाते. या योजनेत घेतली जाणारी रक्कम भाविकास एकदाच भरावी लागते.
अभिषेक
मठात नित्यनेमे स्वामिंच्या मुर्तीचा अभिषेक केला जातो. तसेच विशेष दिवसांना स्वामींचा महाअभिषेक केला जातो. स्वामींच्या अभिषेक पूजनाने उपासकाच्या मनातील ईच्छा पूर्ण होणे, त्यावरील संकटाचे निराकरण होणे, अडीअडचण दूर होणे, शांती अन समाधान लाभने, त्याला धन धान्य, संपत्ति आणि संतति लाभ होणे इत्यादी लाभ होतात. या अभिषेक पूजनाचे वेळी जो मंत्रोच्चार केला जातो त्याचा स्पंदनांनी उपासकाला मनःशांती प्राप्त होते.
हवन
मठामध्ये अभिषेक व पुजा करताना हवन ही केले जाते. हवन करताना देवतांचे स्मरण करून व त्यांना अवाहन करून त्यांचे आर्शिवाद घेतले जातात. आणि हवनात अर्पण केलेली आहूती योग्य पद्धतीने देवतां पर्यंत पोहचवली जाते हवन करताना मंत्रोच्चारा बरोबर स्वाहा म्हणतात. वास्तविक पाहता स्वाहा म्हणजे अर्पण करणे होय हवन कुंडामध्ये टाळण्यात येणाऱ्या तुपाचे परमाणु मध्ये रुपांतर होऊन ते संपूर्ण वातावरणामध्ये पसरले जाते ज्यामुळे अनेक रोगांचा व दोषांचा नाश केला जातो म्हणून अभिषेक बरोबर हवनाला ही महत्त्व आहे. हा फायदा सर्व स्वामीभक्तांना मिळावा म्हणून मठात होमहवन हे ठराविक दिवशी संपन्न केला जातो.
देणगी
मठासंबंधी
अक्कलकोट मार्गी असलेले टेपाचा पाडा कारगिल नगर मध्ये वसलेले स्वामींचे घर म्हणजेच स्वामी मठ ह्याची उभारणी ८ मार्च २०१२ रोजी झाली. दर गुरुवारी नित्य उपासना, महाप्रसाद तसेच नामस्मरण होत असते. व प्रतेक महिन्याच्या पौर्णिमेला नामस्मरण(जप) होत असते. प्रदोष व्रत पूजा होते. तसेच वर्षाती विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.
नवीन प्रकल्प
अन्नछत्र
मठातील प्रमुख उपक्रमामधील एक अन्नछत्र उभारणे आहे. गोर गरीबांसाठी, स्वामी भक्तांसाठी अन्नछत्राची निर्मिती करण्याचा उपक्रम मठाने हाती घेतला आहे. यासाठी स्वामी भक्तांच्या मद्दतीची साथ मठाला हवी आहे. भाविक विविध पदध्तीने मठाच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता. मठ दानशूर भाविकांना आवहान करते या उपक्रमात मठाची साथ देण्यास.
गौशाळा
अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ इथे गौशाळा बांधण्याचा संकल्प चालू आहे. जागा घेऊन गौशाळा उभारली जाईल. त्यासाठी आपल्या सारख्या दानशूर भक्तांनी सढळ हस्ते मदत केल्यास आमचा संकल्प तुमच्या दानातुन पूर्ण होईल.
अन्नदान व गुप्तदान हे सर्व श्रेष्ठदान
अक्कलकोट - तुळजापूर - पंढरपूर यात्रा
Day(s)
:
Hour(s)
:
Minute(s)
:
Second(s)
₹ ३५०० / प्रत्येक सीट*
-
यात्रा: २५/०१/२०२४
Event Date
- नाव नोंदणी: ११/१/२०२४ - २३/०१/२०२४
- सुविधा- सकाळी चहा नाष्टा - दुपारी जेवण, रात्री जेवण
गाडी सुटण्याची वेळ- शुक्रवार दिनांक- २५/०१/२०२४ रोजी ठीक रात्री ९ वाजता विरार मनवेल पाडा तलाव येथून गाडी सुटेल व रविवारी दिनांक- २७/०१/२०२४ रोजी गाडी विरारला परतीच्या प्रवासाला निघेल.
प्रवासातील सुविधा- सकाळी चहा नाष्टा – दुपारी जेवण, रात्री जेवण
एकूण खर्च- प्रत्येक सीट ३५००/- रुपये आकारण्यात आले आहेत
तसेच ५ ते ८ वर्षातील मुलांचे वेगळ्या सीट घेतल्या नाही आहेत त्याचे जेवणाचे वेगळे १०००/- रुपये आकारण्यात आले आहेत.
स्थापना
भंडारा
कार्यक्रम
संस्थापकांचे वाढदिवस
-
कार्यक्रम: ३० जून २०२३
Event Date
संस्थापकांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला
दुर्गाष्टमी होमहवन
-
कार्यक्रम: २९/०९/२०२३
Event Date
दुर्गाष्टमी निमित्त होमहवन चा मठात होणारा कार्यक्रम
नवनागाची मूर्ती स्थापना
-
कार्यक्रम: ८ मार्च २०२३
Event Date
वर्धापन दिन कार्यक्रम आणि यादिवशी नवनागाची मूर्ती स्थापना करण्यात आली
देव दिवाळी कार्यक्रम
-
कार्यक्रम: १३ डिसेंबर २०२३
Event Date
देव दिवाळीनिमित्त मठामध्ये सर्व ठिकाणी पणत्या लावण्यात आले
गुरुपौर्णिमा कार्यक्रम
-
कार्यक्रम: ३ जुलै २०२३
Event Date
गुरुपौर्णिमा निमित्त मठामध्ये पाद्यपूजन चा कार्यक्रम करण्यात आला
दत्त जयंती कार्यक्रम
-
कार्यक्रम: २६ डिसेंबर २०२३
Event Date
दत्त जयंती निमित्त मठामध्ये अभिषेक व होम हवन करण्यात आले
विरार मठ वर्धापन दिन
-
कार्यक्रम: ८ मार्च २०२४
Event Date
मठाचा वर्धापन दिन आणि महाशिवरात्री निमित्त आजचा महाप्रसाद
अन्नदान व गुप्तदान हे सर्व श्रेष्ठदान
|| शिव भावी जिव भावी ||
|| गुप्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ||
|| स्वामी सिंहासन दानपेटी ||
दानशूर वीरांना नम्र विनंती गुरुवार दिनांक २५ /११/ २०२१ रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर गुप्त दानपेटी बसवण्यात येत आहे. या पेटीतून येणारे गुप्तदान गुरुवार दिनांक २४/ ११/ २०२२ रोजी देव दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी ठीक
५:३० वाजता सर्वांच्या देखत गुप्त दानपेटीतील रक्कम मोजली जाईल. त्या दानातून स्वामी सिंहासन बनविण्याचा मठाचा संकल्प आहे. आपण या संकल्पात सहभागी व्हाल हीच स्वामी चरणी प्रार्थना
ज्या भक्तांना पावतीतून दान द्यावयाचे असल्यास देऊ शकतात.ते ही गुप्तदानातच जमा करण्यात येईल. आपण स्वामींना एक रुपया देणार तर स्वामी आपल्याला १० रुपये देतात. हाच विश्वास स्वामींवर ठेवा. दान करण्याने पुण्याई पदरात पडते.
संपर्क
८००७४८१७०४ / ८७७९३४०८४०
या गोष्टी दान कराव्यात
प्रत्येक धर्मात दानाची महत्ता मानली आहे.पण दान देण्याचेही काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे दान केल्यास पुण्य मिळते.
१) माणसाने आपल्या द्वारे प्रामाणिकपणे कमावलेल्या कमाईचा दहावा भाग सत्कर्मामध्ये लावायचा हवा. जो मनुष्य आपल्या पत्नी,पुत्र आणि कुटुंबाला दुःखी करून दान करतो तो जिवितपणी आणि मृत्यूनंतरही दुःखी राहतो.
२) स्वतः जाऊन दिलेले दान उत्तम आणि घरी जाऊन दिलेले दान मध्यम फलदायी असत. तसेच दान देऊ नये असा सल्ला देणारा माणूस सदैव दुःखी असतो.
३) दान करण्याऱ्यानी पूर्वभीमुखी होवून दान केले पाहिजे. आणि
उत्तराभिमुखी होऊन दान ग्रहण करायला हवे असे केल्याने दान देणाऱ्याचे आयुष्य वाढत आणि घेण्याऱ्याचे आयुष्य क्षीण होत नाही.
४) दिन , निर्धन , अनाथ ,मूक, विकलांग , वयोवृद्ध, गौशाळा, अनाथ शाळा, अन्नदान, रोगी मनुष्याच्या सेवेसाठी , शिक्षणासाठी जो धन खर्च करतो त्याचे पुण्य महान ठरत.
५) अन्न ,पाणी, अश्व,गाय, वस्त्र, छत, आणि गुरूला आसन या आठ वस्तुंचे दान मृत्यूनंतर येणाऱ्या कष्टांतुन मुक्ति देत आणि आपल्या २१ पिढ्यांचा उध्यार होतो.
६) गाय, घर, वस्त्र, कन्या, धन हे दान हे दान एकाच व्यक्तीने केले पाहिजे. रुग्णांची सेवा करणे, देवतांची पूजा करणे. गुरुचे पाय धुणे, हे पुण्याचे कार्य आहे. यामुळे कुलस्वामिनी प्रसन्न होते.
७) गाय, सोने, चांदी, रत्न ,विद्या ,तीळ, कन्या, हत्ती, अश्व वस्त्र, भूमी, अन्न, दूध, , छत्र, धन, आणि आवश्यक सामुग्रीसह या १६ वस्तू दान करणे म्हणजेच महादान मानले जातात. ४२ पिढ्यांचे उद्धार होतो.
या गोष्टी दान करू नये
आयुष्यात अनेक गोष्टी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. परंतु या गोष्टी कधीही कोणाला दान करू नये. शिळे, अन्न, फाटलेले कपडे, झाडू, चाकू, किंवा कात्री या गोष्टी चुकूनही दान करू नये. त्यामुळे तुमच्या घराचे नुकसान होते. कुलस्वामी प्रसन्न होत नाही.
आजीवन योजने मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल?
आजीवन योजने मध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेशी संपर्क साधुन नाव नोंदणीचा अर्ज भरावा लागेल.
मठात स्वामींचा अभिषेकाचा मठाचा वेळ काय आहे?
मठात स्वामींचा अभिषेकाचा मठाचा वेळ पहाटे ५.३० वाजता केला जातो.
अन्नदाना साठी देणगी सह भाजीपाला, इतर साहित्य ही स्विकारले जाते ?
अन्नदाना साठी देणगी सह भाजीपाला, इतर साहित्य ही स्विकारले जाते.
मठात सेवा देण्यासाठी नोंदणी कशी करायची?
मठात सेवा देण्यासाठी संस्थेला संपर्क साधून नाव नोंदणी करावी.
मठाचा वर्धापन दिन कधी असतो?
८ मार्च हा दिवस मठाचा वर्धापन दिवस असतो.